
गुहागर मतदार संघावर भाजपचा दावा
गुहागर मतदारसंघ हा भाजपचा मतदार संघ असून ही जागा जनसंघापासून निवडून येत आहे.दहा वर्षांपूर्वी यामध्ये मतदारसंघात वेगळा विषय झाला असला तरी यावेळी युतीच्या वाटपामध्ये ही जागा भाजपची असून ती भाजपलाच मिळाली पाहिजे असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ विनय नातू यांनी केला आहे. अशी आपण मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील एकूण पाच विधानसभा जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत.यापूर्वी भाजपकडे असलेली रत्नागिरीच्या जागेवरही सेनेचे आमदार प्रतिनिधीत्व करीत आहेत.यावेळी तेथेही सेनेचाच उमेदवार घोषित होणार आहे.यामुळे भाजपसाठी एकमेव गुहागरची जागा मिळत आहे.ही जागा कायम राहावी अशी आपली मागणी आहे. राज्यात युतीच्या वाटपाबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुहागरच्या जागेबाबत योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास त्यानी व्यक्त केला.
www.konkantoday.com