मिरकरवाड्यात शेडमध्ये न बसणार्या मच्छी विक्रेत्यांविरूद्ध प्रशासन आक्रमक.
रत्नागिरी येथील मिरकरवाडा क्षेत्रात मच्छी विक्रेत्या महिला गटारावर बसून मच्छी विकत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. मच्छीमार प्राधिकरणाने मच्छी विक्रीची सोय केलेली असतानाही अनारोग्य निर्माण होईल अशा ठिकाणी मच्छी विक्री होत असल्याने पोलीस बंदोबस्त मागवून विक्रेत्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. प्राधिकरणाने नेमून दिलेल्या जागी विक्रेत्यांनी मच्छी विक्री करावी असे बजावण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मिकरवाडा मच्छीमार प्राधिकरणाच्या अधिकारी अक्षया मयेकर यांनी मच्छी विक्रेत्या महिलांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमून दिलेल्या जागी मच्छी विक्री करण्यात कोणत्या अडचणी आहेत अशी विचारणा केली. अडचणी कळवल्यास त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मात्र मच्छी विक्री करणार्या महिलांनी त्यांच्या अडचणींसंदर्भात कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणून सोमवारी पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला व गटारावर मच्छी विक्री करू नये असे बजावण्यात आले.www.konkantoday.com