जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय परिषद 2024 मध्ये “कोंकणातील कातळशिल्प” विषयावर कोंकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे शोध निबंध सादर.

लेपजेक (leipzij) जर्मनी येथे युरोपियन असोसिएशन फॉर साऊथ एशिया आर्कीयोलॉजी अँड आर्ट, ( European Association for South Asian Archaeology and Art has been European forum in its field since its foundation in 1970) द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद 2024 मध्ये “कोंकणातील कातळशिल्प” विषयावर कोंकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे शोध निबंध सादर करण्यात आला.”कोंकणातील कातळशिल्प (Geoglyphs)” या विषयावर देशाच्या बाहेर जावून आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्यात आलेला हा पहिलाच शोधनिबंध. दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी जर्मनी मध्ये झालेल्या ‘यूरोपियन असोसिएशन ऑफ़ साउथ एशियन आर्कियोलॉजी आणि आर्ट’ च्या २६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत टीम, कोकण कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे श्री. ऋत्विज आपटे आणि दिव्यांश कुमार सिन्हा यांनी कोंकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित शोधनिबंधाचे सादरीकरण केले. आत्तापर्यंतच्या आमच्या कामामधील हा जणू एक मैलाचा दगड आहे, कारण प्रथमच कोकण कातळशिल्पांबद्दलचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर झाले. याचा आम्हाला आनंद आहे. याशिवाय, आम्ही २०१५ पासून कातळशिल्पांबाबतीतले शोध निबंध रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, सोसायटी ऑफ साऊथ एशियन आर्कियोलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ प्रिहिस्टरी अँड क्वाटरनरी स्टडीज अशा विविध नामांकित राष्ट्रीय स्तरावरील परिषदेतून सादर केले आहेत. निसर्गयात्री संस्थेच्या अथक परिश्रमांमुळे आणि संचालक पुरातत्त्व विभाग, महाराष्ट्र शासन तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र यांच्या पुढाकारातून २०२२ मध्ये नऊ कातळशिल्प ठिकाणे यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या प्रस्तावित यादीत समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध सादर करताना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार ( डीएसटी ), व आय आय टी एम प्रवर्तक, आय आय टी मद्रास यांच्या विशेष सहकार्याबद्दल आभार. तसेच सातत्याने आमच्या पाठीशी उभे असणारे श्री अखिलेश झा, डॉ. तेजस गर्गे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे मनःपूर्वक धन्यवाद. टीम, कोंकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्र, रत्नागिरी सुधीर (भाई) रिसबूड, धनंजय मराठे, ऋत्विज आपटे, दीव्यांश सिन्हा, तार्तिक खातू, रघुनाथ बोकील, मधुसूदन राव, स्नेहा दबडगाव, रेणुका जोशी, गार्गी परुळेकर. 9422372020, 7507134624, 9423297776

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button