खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचा अचानक मृत्यू.

संगमेश्वर तालुक्यातील दख्खन तिघे खेकडे पकडण्यासाठी गेले असता वाट चुकल्याने भरकटले. त्यातील एकजण आपल्याला वाट माहिती आहे असे सांगून पुढे गेला मात्र त्याचा मृत्यू झाला.येथील सचिन प्रकाश जाधव (वय ४०), शिवराम तुकाराम घुमे (वय ५०), सुरेश गणपत गोरुले वय ६० असे तिघे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुर्शी येथून नदीतील खेकडे पकडण्यासाठी गेले होते. रात्री उशीर झाल्याने मुख्य वाटेवर येण्यासाठी वाटेचा अंदाज चुकल्याने भरकटले.मुर्शीत येणारी नदी ही आंबा घाटातून येत असल्याने नदीच्या दिशेने आंबा घाटातील ओझरे खिंड येथे आले. मात्र रस्ता सापडेना. यातच सुरेश गोरुले यांनी मला वाट माहिती आहे असे सांगून पुढे गेले व त्यापाठोपाट सचिन जाधव व शिवराम घुमे यांना सांगून पुढे चालू लागले. मात्र वाटेतच सुरेश गोरुले यांचा मृत्यू झाल्याचे समजताच व वाटेचा अंदाज चुकल्याने सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी गावातील सुरेश भोज यांना सांगितले.भोज यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी सांगितलेले ठिकाण याचा अंदाज न आल्याने सापडू शकले नाहीत. आज पुन्हा शोधण्यास सुरुवात केली असता आंबा घाटातील ओझरे खिंड येथे मृतदेह सापडून आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button