किमान वेतन मिळण्यासाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन.
गेल्या १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवास स्थानावर कडक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक यामध्ये सहभागी होणार असून त्यांनी नुकतेच चिपळूण दौर्यावर येवून गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनही दिले.www.konkantoday.com