रस्ते गुळगुळीत झाल्याने नेत्यांनी वारंवार चिपळुणात यावे, चिपळूणकरांची मागणी.
पावसाळ्यात उडालेल्या रस्त्यावरून लोकप्रतिनिधींचा दौरा होत असल्याने ते तत्काळ खड्डेमुक्त करण्यात आले. यापूर्वी याच रस्त्यावर ये-जा करताना वाहने आदळण्याचा प्रकार होत असताना खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारकांचा हा त्रास कमी झाला आहे. एकीकडे खड्डेमुक्त रस्त्याविषयी समाधान व्यक्त होत असले तरी दुसरीकडे हे खड्डे किती दिवस टिकतात, असाही प्रश्न पुढे येत आहे.शनिवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौर्यापाठोपाठ रविवार, सोमवार असे दोन दिवस राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चिपळूण शहरात येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर ते ज्या ज्या मार्गावरून प्रवास करणार आहेत, ते सर्व मार्ग खड्डेमुक्त करण्यात आले.www.konkantoday.com