रत्नागिरी जिल्ह्यात ई-शिधापत्रिकेला अत्यल्प प्रतिसाद.

रत्नागिरी जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांचे ई रेशनकार्ड काढण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याची माहिती समोर येत आहे. पारंपारिक शिधापत्रिकेला ई शिधापत्रिकाही सहज उपलब्ध होते. मात्र अजूनही जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांचा कल अजूनही हाती रेशनकार्ड बाळगण्याकडेच असल्याचे दिसून येत आहे. तर काही सुशिक्षित नागरिक मात्र ई शिधापत्रिका वापरत असल्याचे दिसून येत आहे.आपले रेशनकार्डही ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करणे शक्य आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या ई शिधापत्रिका वापरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी असलेला इंटरनेट टॉवरचा अभाव पाहता मोबाईलमध्ये शिधापत्रिका डाऊनलोड करणे कटाक्षाने टाळले जात आहे. तसेच ई-शिधापत्रिकाबाबत नसलेल्या अपुर्‍या माहितीमुळे ई-शिधापत्रिका डाऊनलोड केल्या जात नाहीत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button