भोस्ते घाट मृतदेहाचे गूढ कायम, सर्व बाजूनी चौकशी सुरू.

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील वळणावरील जंगलमय भागात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा तिढा अजूनही कायमच आहे. अद्याप मृतदेहाची ओळखच न पटल्याने आत्महत्या की हत्या, याचा उलगडा अजूनही झालेला नाही. स्वप्नात मृतदेह आल्याचे सांगणार्‍या योगेश पिंपळ आर्या (३०, रा. आजगांव-सावंतवाडी, सिंधुदुर्ग) या तरूणाला चौकशीसाठी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. घटनेपासून भोस्ते घाटातील जंगलमय भागही तपासाचा केंद्रबिंदू बनला आहे. रविवारहीही येथील पोलिसांनी घाटातील जंगलमय परिसर पिंजून काढला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button