
चिपळूण तालुक्यातील सावर्डे भुवडवाडीतील कात कारखान्यातून दूषित पाणी, प्रशासन यंत्रणा गप्प
चिपळूण तालुक्यातील सावर्डे भुवडवाडीतील लोकांना कात कारखान्यातून सोडल्या जाणार्या दूषित पाण्यामुळे पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शेतीचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा येथे मोठा प्रश्न निर्माण झालेला असताना प्रांताधिकारी आकाश लिंगाडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १५२ अंतर्गत अधिकार असतानाही केवळ सावर्डेच्या दूषित पाणी या विषयात केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेत दिसत आहेत, असे सांगून याबाबत आपण न्यायालयीन लढा लढणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ओवेस पेचकर यांनी सांगितले.सावर्डेतील या दूषित पाण्यासंदर्भात प्रांताधिकारी यांनी आपल्या अधिकारात या ठिकाणी तातडीने उपाययोजना करायला हव्या होत्या. शिवाय संबंधित कारखान्यावर कारवाई करायला हवी होती. मात्र त्यांनी ती केलेली दिसून येत नाही. त्याबाबत आपण या ग्रामस्थांसोबत असून न्यायालयीन लढा देणार आहोत, अशी माहिती ऍड. पेचकर यांनी दिली. सावर्डे भुवडवाडी येथे काही दिवसांपूर्वी एकाच कारखान्यातील दूषित पाणी सोडले गेले आहे. यामुळे येथील शेतीचे नुकसान झाले आहे.www.konkantoday.com