प्रतिपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेबाबत एकदिवशी कार्यशाळा संपन्न रत्नागिरी, दि. 24 (जिमाका) : जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत प्रतिपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेबाबत एकदिवशी कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या कार्यशाळेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, समृध्दी अजय वीर, बालकल्याण समितीचे सदस्य शिरीष दामले,अॕड. रजनी सरदेसाई, अॕड. प्रिया लोवलेकर, डॉ. स्नेहा पिलणकर तसेच कार्यशाळेचे प्रशिक्षक म्हणून कॅटलिस्ट फॉर सोशल अॕक्शन, मुंबई येथील नियती त्रिवेदी व युनिसेफच्या रिणी भार्गव यांची उपस्थिती होती. कार्यशाळेमध्ये प्रतिपालकत्व सेवा ( फॉस्टर केअर) या योजनेचा लाभ विविध शासकीय व खासगी संस्थेतील बालक तसेच संस्थेबाहेरील अनाथ व गरजू बालकांना कशा पध्दतीने मिळवून दिला जाऊ शकतो, याबद्दल विचार मंथन करण्यात आले. कार्यशाळेचा उद्देश फॉस्टर केअर संदर्भात जिल्ह्यासाठी कृती आराखडा तयार करणे हा असून फॉस्टर केअर ही सेवा योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक उपाय योजना, आवश्यक सहाय्य, समुदायात जन जागृतीचे माध्यम यावर चर्चा करण्यात आली. या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून कॅटलिस्ट फॉर सोशल अॕक्शन, मुंबई या सामाजिक संस्थेच्या नियती त्रिवेदी व यूनीसेफ च्या रिणी भार्गव यांनी फॉस्टर केअर याविषयी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. फॉस्टर केअर ही बालकांच्या पालनपोषणासाठी तात्पुरती व्यवस्था असून ती दत्तक विधान या प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे. यामध्ये पालक तात्पुरत्या स्वरूपात बालकाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी बाल कल्याण समितीच्या आदेशाने स्वीकारू शकतात. या प्रतिपालकत्व योजनेच्या माध्यमातून अनाथ निराधार बालकांना कुटुंबात पुनर्वसन केले जाते, असे त्यांनी सांगितले. जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी श्रीमती वीर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील अनाथ व गरजू बालकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी व निरीक्षणगृह/बालगृहातील कर्मचारी वर्ग, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, चाईल्ड लाईन, बाल विकास प्रकल्प (नागरी) कर्मचारी, संरक्षण अधिकारी इ. उपस्थित होते. तसेच जिल्हा महिला व बालविकास विभागातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग या कार्यशाळेस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.विक्रम कानवडे यांनी केले, कायक्रमाचे आभार प्रदर्शन माहेर संस्थेचे अधिक्षक सुनिल कांबळे यांनी मानले. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button