नको त्या अवस्थेत सापडल्याने खेडमधील एका काँग्रेसच्या नेत्याला जमावा कडून मारहाण.

एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला युवतीसोबत ऑफिसमध्ये वेगळ्या अवस्थेत पकडल्यानंतर जमावाने या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली. संबंधित पदाधिकारी काँग्रेसचा असल्याचे समोर आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील कार्यालयात हा पदाधिकारी एका महिलेसोबत होता. भर दिवसा कार्यालयाचे दरवाजे बंद करून हा पीडित महिलेसोबत आत होता. गेल्या काही दिवसांपासून या पदाधिकाऱ्याच्या वागणुकीवर स्थानिकांना संशय होता. हा पदाधिकारी नेहमी प्रमाणे कार्यालयात आला होता. पीडित महिला ही याच कार्यालयामध्ये कामाला होती. दुपारच्या वेळी परिसरात वर्दळ कमी झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने कार्यालयाचे शटर बंद केले.महिलेचे निकटवर्तीयांनी कार्यालयावर पोहोचले आणि शटर उघडून आत गेले. तेव्हा दोघेही नको त्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने या पदाधिकाऱ्याला चांगलाच चोप दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले. कार्यालयापासूनहाकेच्या अंतरावरच पोलिस स्टेशन आहे. पोलिस या पदाधिकाऱ्याला पोलिस स्टेशनला घेऊन जात होते, तेव्हा पुन्हा एकदा संतप्त जमावाने या पदाधिकाऱ्यावर हल्ला केला. भर रस्त्यावर जमावाने त्याला बेदम मारहाण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button