जबलपूर-कोईमतूर साप्ताहिकाला ३० ऑक्टो. पर्यंत मुदतवाढ


कोकण मार्गावरून धावणार्‍या जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशलला मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने गुरूवारी सायंकाळी जाहीर केले.
त्यानुसार ०२१९८/०२१९७ क्रमांकाची जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक स्पेशल दर शुक्रवारी २७ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. यापूर्वी साप्ताहिक स्पेशल ६ ऑक्टोबरपर्यंत धावणार होती. परतीच्या प्रवासात दर सोमवारी ३० ऑक्टोबरपर्यंत धावेल.
यापूर्वी परतीसाठी स्पेशल ९ ऑक्टोबरपर्यंत धावणार होती. जबलपूर-कोईमतूर साप्ताहिक स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. याचमुळे स्पेशलला मुदतवाढ देण्याचा निर्णय पश्‍चिम मध्य रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button