राजापूर तालुक्यातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरूवात- पालकमंत्री उदय सामंत.
राजापूर तालुक्यातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरूवात केली असून, यापुढे येणार्या प्रत्येक प्रकल्पाचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतरच त्यांला मंजुरी दिली जाईल. तालुक्यात होऊ घतलेल्या मायनिंग प्रकल्पापासून पर्यावरणाला जर धोका निर्माण होत असेल तो रद्द करण्याची मागणी केली असल्याचे सांगताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका राजापुरात आयोजीत कार्यकमात केली.अकार्यक्षम प्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख करताना कोणतेही पद नसतानाही किरण सामंतांनी विकासाचा धडाका लावला आहे तर येथील पतिनिधी सध्या मताचा कटोरा घेऊन जोगवा माग असल्याची टीका राजापुरात आयोजित उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारत भूमिपूजन कार्यकम प्रसंगी केली.