रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन मेम्बर्स ची कोल्हापूर येथील लोहपुरुष स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी. आरती दामले यांचा पोडियम फिनिश.

कोल्हापूर इथे रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित KSC- लोहपुरुष ट्रायथलॉन आणि ड्युओथलॉन स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन मधील मधील 9 जण सहभागी झाले आणि सर्वानी आपल्या कामगिरीची छाप स्पर्धेवर सोडली.विनायक पावसकर, अमित कवितके आणि यतिन धुरत यांनी यशस्वीरित्या हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली डॉक्टर नितीन सनगर, आरती दामले यांनी यशस्वीरित्या ऑलीम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली डॉक्टर राज कवडे यांनी ऑलीम्पिक डिस्टन्स ड्युऑथलॉन मध्ये अप्रतिम फिनिश केला तसेच श्री चंद्रशेखर शिंदे आणि श्रीलेश शिंदे यांनी स्प्रिंट ड्युऑथलॉन मध्ये सुंदर कामगिरी केली… मयूर देसाई यांनी ऑलीम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न केला… कोकण कोस्टल मॅरेथॉन मध्ये १० किमी च पेसींग करण्याच्या निमित्ताने रेग्युलर रनिंग सुरु करणाऱ्या आरती दामले, या रत्नागिरी जिल्ह्यामधून या स्पर्धेत सहभागी होऊन जिंकणाऱ्या पहिल्या महिला ट्रायथलीट ठरल्या आहेत.आरती दामले यांनी त्यांच्या वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन टीम च्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला.सायकलिस्ट क्लब च्या माध्यमातून होणाऱ्या रेग्युलर सायकल राईड, कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या रेग्युलर होणाऱ्या प्रॅक्टिस रन यामुळे ट्रायथलॉन करण्याची प्रेरणा मिळाली ,कधीही मी आयुष्यात धावेन असं वाटलं नव्हतं पण कोकण कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केल्यामुळे एक आत्मविश्वास मिळाला असं यावेळी आरती दामले म्हणाल्या. विनायक पावसकर यांनी याच महिन्यात सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशात पूर्ण केली होती, आज त्यांनी हाल्फ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्यावर डॉक्टर नितीन सनगर यांचे विशेष आभार मानले. डॉक्टर नितीन यांनी स्वत: यशस्वी स्पर्धा पूर्ण करतानाच सहभागी स्पर्धकांची डाएट तसेच स्पर्धेआधीची मानसिक तयारी सुद्धा करून घेतली असं यावेळी श्री विनायक पावसकर म्हणालेरत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कोकण कोस्टल मॅरेथॉन च्या whatsapp ग्रुप वरील सकारात्मक आणि प्रोत्साहनपर वातावरणाचा फायदा झाला असं यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांनी सांगितलं. चिपळूण येथील अहमदली शेख यांनी सुद्द्धा हाफ आयर्नमॅन स्पर्धे मध्ये उत्तम कामगिरी करत अप्रतिम पद्धतीने स्पर्धा पूर्ण केलीगेल्या दोन वर्षात रत्नागिरी सायकलिस्ट क्लब च्या माध्यमातून शहर आणि आजूबाजूच्या परिसरात विविध सायकलविषयक उपक्रम राबवले जात आहेत आणि त्यामुळे सायकल संस्कृती वाढायला मदत झाली आहे. मागील वर्षीपासून या सायकलिंग ला कोकण कोस्टल मॅरेथॉन ची जोड मिळाली आहे, आणि कोकणवासीय या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून सायकलिंग आणि रनिंग कडे वळले आहेत आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत. ओलीम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन म्हणजे ६ तासात १.५ किमी पोहणे, ४० किमी सायकल चालवणे आणि १० किमी धावणे हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन म्हणजे १० तासात १.९ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणेजगप्रसिद्ध अशा कस लावणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व सहभागी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉन मेम्बर्स चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button