मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींचा धुमाकूळ.
मालवण किनारपट्टीवर मलपी येथील हायस्पीड बोटींनी धुमाकूळ घातला आहे. मोठया संख्येने या बोटी अगदी १० वाव क्षेत्र पर्यंत येऊन मासळीची लूट करत आहेत. मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान केले जात आहेयाबाबत स्थानिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाचे वारंवार लक्ष वेधल्या नंतर शितल ही गस्ती नौका कार्यान्वित करून मत्स्य परवाना अधिकारी भालेकर व पोलीस कर्मचारी लुडबे व टीम अशी संयुक्त गस्त शुक्रवारी करण्यात आली. देवबाग तारकर्ली समोर सुमारे १४ वाव खोल समुद्रात जाळी टाकून मासेमारी करणाऱ्या सुमारे ३० पेक्षा जास्त हायस्पीड बोटिंच्या जवळ गस्ती नौका येत असल्याचे पाहून हायस्पीड बो्टींनी पळ काढला. समुद्रात मासेमारीसाठी टाकलेली जाळी कापून कारवाईच्या भीतीने हायस्पीड बोटी पळाल्या.