मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी-ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी गौप्यस्फोट केला आहे. मालवणमधील शिवरायांचा पुतळा बनवण्यासाठीच्या पैशाचा वापर नारायण राणेंच्या लोकसभा प्रचारासाठी करण्यात आल्याचा गंभीर आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.आमदार वैभव नाईक म्हणाले की, पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण 26 लाख रुपये देण्यात आले आहे. त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जिल्हा नियोजनामधून 5, 54, 35,000 रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्हीकडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवणमध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप नाईकांनी केलाwww.konkantoday.com