
दापोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल दळवी यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
दापोली तालुक्यातील वेळवी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कार्यकारी परिषदेचे सदस्य सुनिल दत्तात्रय दळवी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या एकात्मिक समाज कल्याण संस्थेने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, हरमल, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे कॉलेज, गोवा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.www.konkantoday.com