रत्नागिरीत उद्यापासून पुण्यस्मरण कीर्तन सप्ताह.
रत्नागिरी : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ व महिला कीर्तनकार रत्नागिरी आयोजित २३ सप्टेंबर पासून रत्नागिरीत पुण्यस्मरण कीर्तन सप्ताह साजरा होत आहे.रत्नागिरीतील नामवंत कीर्तनकार आदरणीय कै.नाना जोशी व कै. किरण जोशी यांना श्रद्धांजली म्हणून या पुण्यस्मरण कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ व रत्नागिरीतील सौ सायली मुळ्ये दामले, सौ स्पृहा चक्रदेव आदी महिला कीर्तनकार यांच्या आयोजनातून हा महिला कीर्तन सप्ताह पितृपक्षात २३ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये ल.वि केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात होणार दररोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे .या कीर्तन सप्ताहात, २३ रोजी संत ज्ञानेश्वर या विषयावर ह.भ.प सौ प्रज्ञा देशपांडे(पुणे),२४ रोजी भक्त गावबा या विषयावर ह.भ.प.सौ नम्रता व्यास निमकर(पुणे) ,२५ ला संत भानुदास विषयावर ह.भ.प सौ वेदश्री ओक (मुंबई),२६ रोजी बैजू बावरा व गोपाळ नायक या विषयावर ह.भ.प सौ सुखदा मुळ्ये घाणेकर(पनवेल),२७ ला रामकृष्ण परमहंस या विषयावर ह.भ.प सौ स्पृहा चक्रदेव(रत्नागिरी),२८ ला संत नामदेव भोजन विषयावर ह.भ.प. सौ. रेशीम खेडकर (पुणे), दि.२९ ला भक्त सुखीया माळीण या विषयावर ह.भ.प सौ सायली मुळ्ये दामले (रत्नागिरी)यांचे कीर्तन रंगणार आहे.कीर्तन सप्ताहात तबला साथ केदार लिंगायत,हेरंब जोगळेकर,वरद जोशी,कैलास दामले,वेदांत जोशी,निखिल रानडे,प्रथमेश शहाणे करणार आहेत.तर ऑर्गनच्या साथीला चिंतामणी निमकर,श्रीरंग जोगळेकर,चैतन्य पटवर्धन,विजय रानडे,महेश दामले,संतोष आठवले,नितीन लिमये करणार आहेत.या कीर्तन सप्ताहाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहेत.