
जागतिक शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित मराठमोळे गुरुजी रणजितसिंह डिसले यांनी कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनमार्फत दिला जाणारा ‘जागतिक शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित मराठमोळे गुरुजी रणजितसिंह डिसले यांनी कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज ठाकरे आणि डिसले गुरूजींनी अनेक विषयांवर चर्चा केली.
पुरस्कारप्राप्ती नंतर डिसले गुरुजींनी मिळालेलं मानधन शिक्षणक्षेत्रासाठी दान केलं, त्यांनी दाखवलेल्या ह्या दातृत्वामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. हा खरा महाराष्ट्रधर्म!, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com