पन्हाळेकाजी येथे घरफोडी, लाखांचा ऐवज लंपास.

पन्हाळेकाजी येथील रहिवासी अनिल बाळकृष्ण सावंत व सुरेश जयराम जाधव यांची गुरूवार दि. १६ सप्टेंपर रोजी दोन बंद घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचे घरगुती सामान लंपास केले आहे.या चोरीचा छडा लावण्यासाठी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु श्‍वानपथकाला यश आले नाही. दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हवरे दूरक्षेत्राचे बीट अंमलदार अभिजित पवार, सातार्डेकर या चोरीचा कसून तपास करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button