गुहागर-स्वारगेट बसचे चालक आणि वाहकाला पुणे जिल्ह्यातील खेड, शिवापूर टोलनाक्यावर तिघांकडून जबर मारहाण.

गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-स्वारगेट बसचे चालक आणि वाहकाला पुणे जिल्ह्यातील खेड, शिवापूर टोलनाक्यावर तिघांकडून जबर मारहाण झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी – पुण्यातील राजगड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.गुहागर आगारातून १९ रोजी सकाळी ९.१५ वाजता गुहागर- स्वारगेट ही बस घेऊन चालक वे प्रवीण भगवान नांगरे (३४) आणि वाहक एस. एन. कल्लुरकर गेले होते. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. बस चिपळूण, पाटण, उंब्रज, सातारामार्गे पुणे असा प्रवास करत असताना बस खेड-शिवापूर गावाच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ आली. तेथे एका ट्रकने कंट मारला. हा ट्रक हा टोल पास करून पुढे वजनकाट्यावर थांबला असता चालक प्रवीण नांगरे यांनी ट्रकचालकाला याचा जाब विचारला. बसमध्ये प्रवासी असून त्यांना कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार, असे विचारले असता टोलनाक्यावरील निळा टी-शर्ट घातलेला मुलगा पुढे येऊन तू तरी कुठे एसटी नीट चालवतोस, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण सुरू केली. या एसटी ड्रायव्हरांना लय माज असतो, असे म्हणून शिवीगाळ करीत आपले नाव विशाल जाधव असे त्याने सांगितले. त्याच्याबरोबर आणखी दोन व्यक्तींनी ‘काय झाले, काय झाले’ असे म्हणत चालक प्रवीण नांगरे यांना जबरे मारहाण सुरू केली. या घटनेवेळी वाहकालाही मारहाण केली गेली.मारहाणीत चालकाच्या पायाला, बरगडीला जबर मार बसला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button