आज पुणे येथे जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना शाॅक लागून एकाचा झाला मृत्यू.

जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोन तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला*. *काही क्षणातच जमिनीवर कोसळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला**तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात घडली आहे* घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पंचनामा करून मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील आनंद पार्क येथे आज रविवारी सकाळच्या सुमारास जुलूस मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये अनेकजण सहभागी झाले होते. यातील दोन तरुण डीजेवर चढून झेंडा फडकवत होते. अचानक झेंड्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. डीजेवर चढलेल्या दोन्ही तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. यातील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. घडलेल्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होता आहे. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button