
अकाऊंट हॅक करून लोकांना मेसेज करून पैशांची मागणी करण्याचे प्रकार जिल्ह्यातही घडू लागले.
सध्या फेसबूक, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांचा वापर वाढला असून याच माध्यमातून अकाऊंट हॅक करून लोकांना मेसेज करून पैशांची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काही युवकांनी मित्र-मैत्रिणी पैसी मागत आहेत, म्हणून पैसे पाठवल्याचे प्रकारही घडले आहेत. अशा प्रकारामुळे फसलेल्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्याने या बाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले आहे.तरूणांमध्ये प्रामुख्याने इन्स्टाग्राम, फेसबूक, स्नॅपचॅटचा वापर वाढला आहे. यात इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून अज्ञात व्यक्तीकडून या खात्याला जोडले गेलेल्या सदस्यांकडे मेसेजद्वारे पैशांची मागणी केली जात आहे. या एका तरूणीने आपल्याच मैत्रीणीने पैसे मागितले म्हणून ४ हजार रुपये पाठवले. त्यानंतर तिने मैत्रिणीशी संपर्क करून पैसे पाठवल्याचे सांगितल्यावर मैत्रिणीने कोणताही मेसेज केलेला नसल्याचे समोर आले. त्यानंतर या तरूणीने पोलिसात धाव घेतली. www.konkantoday.com