सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी नाचणे गणातून आशादीप संस्थेला मदत…
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी नाचणे गनातून भाजप कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान आ. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त. रत्नागिरीतील गतिमंद मुलांचे वसतिगृह आशादीप संस्थेला संस्थेच्या वाढीव इमारतीसाठी एक लोड चिरा, फॅन देऊन मदतीचा खारीचा वाटा दिला आहे. त्या संस्थेला मदत करताना आम्हाला मोठे समाधान वाटल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. मृत्यू पक्षामध्ये दानधर्म केले पाहिजे असे रवींद्र जी चव्हाण साहेब सांगतात. तसेच माझा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रमांचा धागा पकडून करा असे चव्हाण साहेबांचे म्हणने आहे असे युवा मोर्चाचे प्रमुख संकेत कदम यांनी सांगितले. म्हणूनच आम्ही साहेबांचा वाढदिवस समाजउपयोगी अशा कार्यक्रमांनी केला आणि आशादीप संस्थेला मदत केल्याने तेथील मुलांनी तयार केलेल्या फुलांनी आमचा सत्कार झाला यामध्ये वेगळाच आनंद आम्हाला मिळाला असे संकेत कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सुनील अडीवरेकर, तालुका चिटणीस राकेश कदम, विजय सुर्वे, सुनील नाचणकर, समीर सावंत, सौरभ सावंत, युवा मोर्चा मंडळाध्यक्ष संकेत कदम, आशादीप संस्थापक रेडकर सर, आधी उपस्थित होते.