
विद्यापीठाची सिनेट निवडणुक उद्याच होणार.
विद्यापीठाची सिनेट निवडणुक उद्याच होणार आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. कालच मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. याबद्दल राज्य शासनाकडून आदेश मिळल्यानंतर २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या स्थगितीचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर आता कोर्टाच्या निर्णयानंतर ही निवडणूक उद्याच म्हणजे २२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता १० नोंदणीकृत जागांसाठी येत्या २२ सप्टेंबर २०२४ साठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या युवासेनेविरुद्ध अभविप यांच्यासह मनसेने देखील कंबर कसली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातले आहे. मात्र काही तासांवर आलेली निवडणूक अचानक राज्य सरकारच्या निर्देशांनंतर रद्द करम्यात आली होती. राज्य सरकारचे आदेश आल्याने निवडणुक स्थगित करत असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून टीका केली जात होती.