इको सेन्सिटिव्ह झोन हटवण्यासाठी पाठपुरावा करणार:-किरण सामंत तुमच्या उपस्थितीने दाखवू दिले महायुच्या उमेदवाराचा विजय निश्चित:-किरण सामंत.

लांजा तालुक्यातील लाकूड व्यावसायिकांची सभा सिंधूरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या उपस्थितीत लांजा येथे पार पडली. यावेळी होणाऱ्या विधानसभेसाठी किरण सामंत यांना लाकूड व्यापारी संघटनेने जाहीर केला. या सभेला शेकडो लाकूड व्यापाऱ्यांनी उपस्थितीती लावली होती. यावेळी किरण उर्फ भैय्या सामंत यांनी उपस्थित लाकूड व्यापारांना मार्गदर्शन केले ते म्हणाले, कुणाला माहित नसेल पण आज सांगतो आम्ही ही पूर्वीचे लाकूड व्यापारी, माझ्या वेंगुर्ला गावात आमची स्वतःची स्वामील असून आमचा चुलत भाऊ त्या ठिकाणी काम पाहत आहे.त्यामुळे तुमची सर्व दुखनी मला न्यात आहेत. तुम्ही मला होणाऱ्या विधानसभेला पाठिंबा जाहीर केल्या बद्दल तुमच्या सर्वांचे आभार म्हणतो आणि ज्यावेळी अश्या संघटना माझ्या मागे उभ्या राहणार असतील तर माझा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन यावेळी किरण सामंत यांनी केले.लांजा-राजापूरच्या लाकूड व्यावसायिकांच्या चांगले दिवस येतील असे काम तुमचा किरण सामंत करून दाखवेल.लाकूड व्यापाऱ्यांवर जेवढ्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या अटी शिथिल करण्यासाठी मी सर्व प्रयत्न करेन.सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या इको सेन्सिटिव्ह झोन मुळे येथील गावांमध्ये वृक्षतोड करता येत नाही.तसेच कोणतेही बांधकाम करता येत नाही ही अडचणीत गेली १० वर्ष भेडसावत आहे.याला शिथिलता मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे काम सुरु आहे.आपण या भागात एमआयडीसी आणण्यासाठी पर्यत केला तर हा इको सेन्सिटिव्ह झोन उठवण्यास शिथिलता मिळेल. आजच्या उपस्थितीने दाखवून दिले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. यावेळी किरण सामंत यांनी केलेल्या मार्गदर्शनाने लाकूड व्यापाऱ्यांची मने जिंकली आहेत. त्यांना खात्री पटली आहे किरण सामंतच न्याय देतील आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजुशेठ कुरूप, सचिन डोंगरकर,लाकुड व्यापारी अध्यक्ष फारुख नेवरेकर,उपाध्यक्ष सुनील कानडे,शरीफ नाईक रफिक उर्फ गुल्या नेवरेकार नाझिम नेवरेकर,सुभाष लाखण हजू बागाव,सुभाष रामाणे अकबर नाईक,रियाज नेवरेकर दिलदार नाईक,पांडुरंग झोरे अजीम वाघु,प्रकाश जाधव घडशी,रफिक म्हालदर ऋषि राऊत,सिराज ठाकूर यांच्या सहित शेकडो लाकूड व्यापारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button