स्वप्न पडलेल्या योगेश आर्याचा सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे भोस्ते घाटात मृतदेह सापडलेल्या प्रकरणाचं गूढ वाढलं.
तरुणाच्या स्वप्नात दिसलेला मृतदेह खेडच्या भोस्ते घाटात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता या प्रकरणाचं गूढ आणखी वाढत चाललं आहे. स्वप्न पडलेल्या योगेश आर्याचा सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे.योगेश आर्या याच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे. पाच दिवस योगेश आर्या भोस्ते घाट आणि वेरळ गावात फिरत होता. ज्याला स्वप्न पडलं त्याचीच चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.भोस्ते घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेरळ येथील ग्रामस्थांनी योगेशपासूनच चौकशी सुरू करावी आणि या मृतदेहाचे गूढ उकलावे, अशी मागमी केली आहे. योगेश आर्याने सोशल मीडियावर टाकलेले व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. खेडमध्ये त्याने डोंगराळ भाग कसा शोधला? कोणत्या व्यक्तीकडून माहिती घेतली हा व्हिडिओदेखील त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे.सिंधुदुर्गातला रहिवासी असलेल्या योगेश आर्या याने आपल्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं वारंवार येत असल्याची फिर्याद पोलिसांना दिली.सिंधुदुर्गातला रहिवासी असलेल्या योगेश आर्या याने आपल्या स्वप्नात भोस्ते घाटात मृतदेह असल्याचं वारंवार येत असल्याची फिर्याद पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनीही त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता त्यांना कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला.योगेश आर्याची फिर्याद घेऊन त्याला सोडून देण्यात आलं, पण त्याचा तपास होणं गरजेचं असल्याचं मत स्थानिक ग्रामस्थांनी मांडलं आहे.