
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आईचा आपल्याच मुलाच्या जीवाशी खेळ, पहा व्हिडिओ.
सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. या महिलेनंही असंच केलं. तिनं आपल्या पोटच्या मुलाला खोल विहिरीत लटकवलं आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विहिरीच्या कडांवर बसून एक महिला आपल्या लहान मुलाचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसत आहे. यावेळी कोणत्याही संभाव्य धोक्याचा विचार न करता ती निष्काळजीपणे मुलाला धरून ठेवताना आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला रील करण्यामध्ये गुंतलेली असताना मुलाने तिचा पाय घट्ट पकडला होता. विहिरीच्या कडेला बसून तिनं मुलाच्या एका हाताला पकडून त्याला विहिरीत लटकवून ठेवलं आहे. मुलगाही प्रचंड घाबरलेला दिसत असून त्यानं आईला घट्ट पकडून ठेवलं आहे. पोटच्या मुलांसाठी आई-वडील वाट्टेल त्या गोष्टी करायला तयार असतात. आपल्या मुलांना साधं खरचटलं तरी आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. पण, या व्हिडीओत एक आई आपल्या पोटच्या मुलाला अशाप्रकारे मृत्यूच्या दारात घेऊन गेली आहे.