संगमेश्वर रेल्वे स्थानकात तीन गाड्यांच्या थांब्या संदर्भात अद्याप निर्णय नाही….वेळेत निर्णय न झाल्यास उपोषण करण्याचा संदेश जिमन यांचा इशारा
. मुंबई:- निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक गृप तर्फे संगमेश्वर स्थानकात एकुण ९ रेल्वे गाड्याना थांबा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर चिपळूण संगमेश्वर चे आमदार श्री शेखर निकम यानी पुढाकार घेवुन कोंकण रेल्वे च्या CMD बरोबर एका बैठकीचे आयोजन केले.▪️या बैठकीत ९ पैकी ३ गाड्याना थांबा देण्याबाबत कोंकण रेल्वे ने सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु बैठक होउन दोन महिने होत आले तरीही या मागण्यांबद्दल अजुन काहीही न कळल्याने या गृप चे प्रमुख श्री संदेश जिमन यानी पत्राद्वारे कोंकण रेल्वेला उपोषणाचा इशारा दिला आहे. *👉🏻या पत्रात म्हटले आहे की…*…▪️आमची निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या फेसबुक ग्रुप तर्फे आपणाकडे एकूण 9 रेल्वे गाडयांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक येथे थांबा मिळावा यासाठी मागणी पत्र देण्यात आले होते व त्यांचा सकारात्मक विचार न झाल्यास दिनांक 15 ऑगस्ट रोजी लक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता ▪️”दरम्यान च्या काळात आमच्या मतदार संघांचे आमदार श्री शेखर निकम यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून दिनांक 24 जुलै 2024 रोजी कोकण रेल्वे च्या बेलापूर येथील मुख्यालयात आपणासोबत आमची एक संयुक्त बैठक आयोजित केली. बैठकीत आमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली. ▪️आपण स्वतः आम्हाला 9 पैकी 3 ते 4 गाड्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे आम्ही पाठवू व तो मंजुर होण्यासाठी जातीनीशी लक्ष देऊ असे आम्हास आश्वासन दिले. त्यप्रमाणे आपण तीन गांड्यांच्या थांब्याविषयीचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवल्याचे समजले. परंतु आता या बैठकीला दोन महिने होत आले तरीही आपणाकडुन या मागणीवर काय निर्णय झाला हे आमच्यापर्यंत आलेले नाही. असेही या पत्रात म्हटले. ▪️पत्रात पुढे म्हटले आहे की “दि २४ जुलै च्या बैठकीत आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालुन रेल्वे बोर्डाकडुन थांब्याला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले होते.आपण दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवुन आम्ही आमचे उपोषण मागे घेतले होते. परतु येत्या काही दिवसात संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील ३ गाड्यांच्या थांब्या बद्दल कोणताही निर्णय न झाल्यास उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.”▪️”संयुक्त बैठकीत आपण आश्वासन दिल्याप्रमाणे 3 गाड्यांचा थांब्याबद्दल काय स्थिती आहे त्याची माहिती आम्हाला आपण लवकरात लवकर आम्हाला द्याल त्याबाबत ठोस निर्णय घ्याल आणि आम्हाला उपोषण करण्याची वेळ आणणार नाही याची आशा बाळगतो. अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल याची नोंद घ्यावी, ही नम्र विनंती शेवटी या पत्रात करण्यात आली आहे.