रत्नागिरीत ऑनलाइन फसवणूक सुरूच लिंक क्लिक करताच खात्यातील पैसे गायब.
रत्नागिरीत ऑनलाइन फसवणूक सुरूच आहे लिंक क्लिक करताच खात्यातील पैसे गायब होण्याचा प्रकार घडला आहेबीएसएनएल कंपनीच्या मोबाईल नंबरवर आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यावेळी बॅंक खात्यातून ९६ हजार ८०० रुपये काढल्याचा मॅसेज आला असल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही घटना ४ ते ९ सप्टेंबर सायंकाळी पाच च्या सुमारास चैत्रबन अभ्युदयनगर नाचणेरोड, रत्नागिरी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भास्कर गोपाळ गाडगीळ (वय ६८, रा. अभ्युदयनगर, नाचणेरोड, रत्नागिरी) हे घरी असताना त्यांच्या बीएसएनएल कंपनीचा नंबर असलेल्या मोबाईलवर अज्ञाताने लिंक आली होती. फिर्यादी यांनी ती लिंक क्लिक केली असता ६ सप्टेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी गाडगीळ यांच्या स्टेंट बॅंक खात्यातून ९६ हजार ८०० रुपये काढल्याचा त्यांच्या मोबाईलवर मॅसेज आला. फसवणूक झाल्याने भास्कर गाडगीळ यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार अद्यापही घडत आहेत