महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने आजारी लघु उद्योगांच्या पुनरूज्जीवनासाठी कार्य करावे-उद्योगमंत्री ना. उदय सामंत.
महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचा पाया रचण्याबरोबरच गेल्या शंभर वर्षात उद्योग व्यापाराच्या स्वर्वांगीण विकासासाठी शिखल संस्था या नव्याने काम करणार्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या या संस्थेने राज्यातील आजारी लघु उद्योगांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान राबवावे, महाराष्ट्र शासन त्यामध्ये सहभागी होईल, अशी सूचना राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केली.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चरच्या ९८ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय उद्योग परिषद व अध्यक्ष पदग्रहण समारंभाचे उदघाटक या नात्याने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. www.konkantoday.com