नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंडणगड मुख्याधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

. मंडणगड नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या मुलभूत समस्यांकडे सत्ताधारी व प्रशासन यांचे लक्ष वेधण्यासाठी शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी बुधवारी शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून मुख्याधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.नगर पंचायत विरोधी पक्ष गटनेते विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, योगेश जाधव, निलेश सापटे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, सेजल गोवळे, स्वीकृत नगरसेवक नरेश बैकर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button