
कामाचा दर्जाबाबत तक्रार असलेल्या चिपळूणातील शिवपुतळा कामावर प्लास्टिक कापडाचे आच्छादन घातल्याने शहरात चर्चेला ऊत
_चिपळूण शहरात साकारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरणाच्या कामावर सध्या प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात आले आहे. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू असून या कामाची तक्रार करणारे माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी पावसामुळे काम उखडू नये म्हणून ठेकेदाराचा हा प्रताप असल्याचा आरोप केला आहे. तर नगर परिषदेने वॉटरप्रुफींगचे काम बाकी असल्याने ही काळजी घेतली असल्याचा खुलासा केला आहे.गेल्या काही वर्षापूर्वी येथे शिवपुतळा उभारणीचे काम सुरू आहे. सध्या सुशोभिकरणातील दगड काम सुरू आहे, असे असताना मुकादम यांनी काही दिवसांपूर्वी दगड काम निकृष्ट केले जात आहे.www.konkantoday.com