
चाकरमानी सुखरूप पोहोचल्याने वाहतूक पोलिसांचा जागता पहारा अखेर संपुष्टात.
गणेशोत्सव कालावधीत वाहनांच्या रेलचेलीने गजबजणार्या महामार्गावर वाहतुकीच्या कोंडीचे विघ्न दूर करण्यासाठी ४ ऑगस्टपासून महामार्गावर २४ तास ड्युटी बजावणार्या महामार्ग वाहतूक पोलिसांसह येथील पोलिसांचा जागता पहारा अहोरात्र ड्युटी बजावत चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यास मौलिक कामगिरी बजावणार्या वाहतूक पोलिसांसह येथील पोलीस यंत्रणेचे गणेशभक्तांनी तोंड भरून कौतूक केले.महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे गणेशोत्सवात वाहनांच्या बेसुमार संख्येने चाकरमान्यांच्या मार्गात वाहतूक कोंडीचा मनस्ताप कायम असतो. यंदाही महामार्गावर वाहतूक पोलिसांचे अपूरे बळ असतानाही महामार्ग वाहतूक पोलिसांनी उत्कृष्टपणे नियोजनाची रूपयेषा आखत उपलब्ध कर्मचार्यांच्या सहाय्याने महामार्गावर चोख व्यवस्था बजावली. याचमुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताच्या संख्येतही कमालीची घट झाली. www.konkantoday.com