काँग्रेसने थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या- संजय राऊत.
मुंबई- काँग्रेसचे विधिमंडळ नेते ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार या विधानानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज सकाळी काय बोलणार याकडं लक्ष लागले होते. संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काँग्रेसला चांगलंच सुनावलं आहे. शिवसेनेमुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या असून, हे जर ते विसरले असतील किंवा विसरू पाहत असतील, तर त्याची आठवण करून देतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या आक्रमक भुमिकेमुळे महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा करु नये, अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळं काँग्रेसच्या जागा वाढल्या असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं. काँग्रेसचे वरीष्ठ नेते असा काही निर्णय घेणार नाहीत. सर्व लहान मित्र पक्षांनाही सामावून घेण्याचे प्रयत्न करावेच लागतील असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीची आज जागावाटपासंदर्भात महत्वाची बैठक पार पडणार आहे. जो जिथं जिंकणारा उमेदवार असेल त्यालाच संधी दिला जाईल असंही संजय राऊत म्हणाले. काही मतभेद झालेच तर पुन्हा बैठक होईल, वरिष्ठ नेते एकत्र बसतील असंही राऊत म्हणाले. दरम्यान, राज्यात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीसंदर्भात देखील राऊतांना विचारण्यात आलं. यावेळी राऊत म्हणाले की, तिसरी आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी असते. कारण ती विरोधकांची मत फोडते असं ते म्हणाले.