
अमेरिकेतील भारतीय वंशाची ध्रुवी पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४अमेरिकेतील कम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिमची विद्यार्थिनी ध्रुवी पटेल हिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड २०२४’चा खिताब पटकावला आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही भारताबाहेर घेतली जाणारी व तीन दशकांहून अधिक काळापासून चालत आलेली भारतीय सौंदर्य स्पर्धा आहे.
मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट परिधान केल्यानंतर ध्रुवीने बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची व यूनिसेफची राजदूत बनण्याची इच्छा व्यक्त केली. न्यू जर्सीमधील एडिसन येथे पार पडलेल्या मिस इंडिया वर्ल्डवाइडच्या अंतिम फेरीत ध्रुवीला विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर ध्रुवीने एकच जल्लोष केला.मिस इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट परिधान केल्यानंतर धृवी म्हणाली, “मिस इंडिया वर्ल्डवाइडचा खिताब जिंकणं हा एक अविश्वसनीय सन्मान आहे. हा मुकूट आयुष्यातील इतर सर्व उबलब्धींपेक्षा मोठा आहे. हा एक मोठा वारसा आहे, यामुळे जागतिक स्तरावर इतरांना प्रेरणा मिळत राहील”. सूरीनामची लिसा अब्दोलहक ही या स्पर्धेतील पहिली रनर-अप ठरली आहे. तर नीदरलँडची मालविका शर्मा हिला दुसरी रनर-अप म्हणून घोषित करण्यात आलं.*मिसेस श्रेणीत सुआन मॉटेट तर मिस टीन इंडिया वर्ल्डवाइडचा खिताब सिएरा सुरेटने पटकावला*मिसेस श्रेणीत त्रिनिदाद आणि टोबॅगोची सुआन मॉटेट विजेती ठरली तर स्नेहा नांबियार पहिली रनर-अप आणि युनायटेड किंगडमची पवनदीप कौर दुसरी रनर-अप ठरली. किशोर श्रेणीमध्ये ग्वाडेलोपची सिएरा सुरेट हिने मिस टीन इंडिया वर्ल्डवाइडचा मुकूट मिळवला. नीदरलँडची श्रेया सिंह आणि सूरनामची श्रद्धा टेडजो या दोघींना अनुक्रमे पहिली व दुसरी रनर-अप म्हणून घोषित करण्यात आलं.