विसर्जनादरम्यान राज्यात २१ जणांचा मृत्यू! मुंबई : गणपती विसर्जनादरम्यान राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये २१ जणांचा मृत्यू झाला. यात उत्तर महाराष्ट्रातील नऊ, विदर्भातील सात, तर विरारमध्ये एक जण दगावला आहे. याखेरीज छत्रपती संभाजीनगरमध्ये एक तर नगर जिल्ह्यात दोन व इंदापूरमध्ये एक जण बुडाला.

धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन बालकांसह एका तरुणीचा मृत्यू झाला. १० जण जखमी झाले. विरार पूर्वेच्या टोटाळे तलावात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमित मोहिते (२४) असे या तरुणाचे नाव आहे. अमित हा विसर्जनासाठी विरारच्या टोटाळे तलावात उतरला होता. याच वेळी अमित याला फिट आली आणि तो पाण्यात पडला.*धुळ्यात तीन बालके ठार*धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन बालकांसह एका तरुणीचा मृत्यू झाला. १० जण जखमी झाले. परी ऊर्फ दिव्यानी बागूल (१३), लाडु ऊर्फ आदित्य पवार (तीन), शेरा सोनवणे-जाधव (सहा) या बालकांसह गायत्री पवार (२०) यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.*मुंबईतील प्रतिष्ठित ‘लालबागचा राजा’च्या मूर्तीचे विसर्जन*दहा दिवसांसाठी पाहुणा आलेल्या गणरायाला मंगळवारी वाजत-गाजत निरोप देण्यात आला. मुंबईतील प्रतिष्ठित ‘लालबागचा राजा’च्या मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर बुधवारी सकाळी झाले. मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास सुरू झालेली मिरवणूक बुधवारी सकाळी १०.३० वाजता संपुष्टात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button