
रत्नागिरीत धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती साजरी
रत्नागिरी : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा कार्यालय मारुती मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेला शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, शहरसंपर्कप्रमुख संकेत घाग, तालुका युवाधिकारी तुषार साळवी, अभिजित दुडे, विकास पाटील, बाळुशेठ साळवी, सौ. दिशा साळवी, सौ. अस्मिता चवंडे, सौ. वैभवी खेडेकर, मानसीताई साळुंखे, सौ. रुपा नागवेकर, सौ. पुजाताई पवार, वेदिकाताई चव्हाण आदी उपस्थित होते.