
महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण सामंत यांची निवड
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी किरण उर्फ भैय्या सामंत यांची निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष पदाचा मान रत्नागिरीला मिळाला आहे. याशिवाय शुभेंद्र भांडारकर- सचिव, संजय बजाज -खजिनदार तर संतोष बोबडे यांची सहसचिवपदी निवड झाली आहे.