
राजापूर बँकेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठीयंत्रणा कार्यान्वित-राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव.
राजापूर बँकेचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी आणि सायबर सुरक्षिततेच्यादृष्टीने यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती राजापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षा अनामिका जाधव यांनी दिली तसेच वर्षभरातील उलाढालीतून ३ कोटी २२ लाख ६२ हजार इतका निव्वळ नफा झाल्यामुळे सभासदांना दहा टक्के लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केल्याचेही त्यांनी सांगितले.राजापूर अर्बन बँकेच्या १०३व्या वार्षिक सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, राजेंद्र कुशे, प्रसाद मोहरकर, दीनानाथ कोळवणकर, प्रकाश कातकर, प्रतिभा रेडीज यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे, वरिष्ठ अधिकारी रमेश काळे आदी उपस्थित होते.