रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ दुचाकी ला डंपर ने मागून धडक दिल्याने दोन जण ठार.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज जुन्या मठाजवळ झालेल्या अपघातात चुलते-पुतणे जागीच ठार झाल्याने नाणीज गावात हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी वेल्डींगच्या कामासाठी नाणीज येथून अरुण अनंत दरडी (वय-३५) व रामचंद्र देवजी दरडी (वय-६५) वेल्डींगच्या कामासाठी खानू येथे दुचाकीवरुन जात असताना डंपरने जुन्या मठाजवळ पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यामध्ये हे दोघे चुलते-पुतणे जाग्यावरच कोसळले व त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची घटना पंचक्रोशीत पसरली आणि लोकांनी नाणीजकडे धाव घेतली. हे दोघे दरडीवाडी नाणीज येथील राहणारे असून अरुण दरडी हा तरुण वेल्डींगचे काम करतो. आपल्या हाताखाली त्याने चुलते रामचंद्र देवजी यांना कामासाठी ठेवले होते. www.konkantoday.com