
सामाजिक ऐक्य बिघडवण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, मुस्लिम समाजाची मागणी.
राजापूर शहरातील प्राचीन आणि ऐतिहासिक नुर आलम दर्गा हा मुस्लिम समाजाच्या व्यवस्थापनाखाली असून या ऐतिहासिक वास्तूला मंदिराची उपमा देवून सामाजिक ऐक्य बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये, शेकडो वर्षाच्या कालावधीत इतिहासाचे वास्तववादी आणि प्रामाणिक अभ्यासक असलेल्या कोणत्याही इतिहासकाराने या वास्तूविषयी खोटा दावा केलेला नाही. परंतु अलिकडच्या काळात द्वेषमुलक आणि कपोलकल्पित इतिहास मांडण्याचा प्रकार दिसत आहे, असे नमूद करीत याचा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी मुस्लीम समाजाकडून करण्यात आली आहे.
याबाबत उमातूल मुस्लिमिन मधील वाडाचे अध्यक्ष शहनवाज ठाकूर, पाच मोहल्ला समितीचे अध्यक्ष शौकत नाखवा, खजिनदार मुदस्सर काझी, सहसचिव भोलू काझी, माजी उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, सलाम खतिब जमातीचे सदस्य एजाज काझी, परवेझ बारगीर आदींनी आवाहन केले आहे.www.konkantoday.com