मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. संध्याकाळी ४ च्या सुमारास मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडेल.संजय पांडे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते राजकीय मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.संजय पांडे हे मुंबईतील वर्सोवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. या जागेवर सध्या भाजपाच्या आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळीही संजय पांडे अपक्ष निवडणुकीला उभे राहतील अशी चर्चा होती. माजी आयपीएस अधिकारी असलेले संजय पांडे हे कायम चर्चेत राहिलेले आहेत. उत्तर भारतीय चेहरा म्हणून संजय पांडे काँग्रेसमध्ये सहभागी होतील. संजय पांडे यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चांगले संबंध आहेत.