महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.
रत्नागिरी, दि. 19 (जिमाका) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या परंतु, अद्याप आधार प्रमाणिकरण न केलेल्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी. सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डाॕ सोपान शिंदे यांनी केले आहे. त्याबाबतचा लघु संदेश शेतकऱ्यांना महाआयटी मार्फत देण्यात आला आहे.* या याजनेंतर्गत आधार प्रमाणिकरण करणे बाकी असलेल्या सर्व 513 जणांनी 30 सप्टेंबरपर्यंत नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र, सी.एस.सी सेंटर अथवा बँक शाखेत संपर्क करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.