
त्या फसवणूक प्रकरणातील सूत्रधाराचा सुगावा.
खेड शहरातील एका तरूणाच्या ऑनलाईन २४ लाख ८५ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा येथील पोलिसांना सुगावा लागला आहे. संशयित सूत्रधार आर्थिक व्यवहारांची सर्व सूत्रे हॅण्डल करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संशयित भारतातीलच असून त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी लवकरच पोलीस निरीक्षक भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना होणार आहेत.शहरातील एका तरूणास जादा रक्कमेच्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी आतापर्यंत चौघांना गजाआड केले आहे. यातील दोघे न्यायालयीन कोठडीत तर अन्य दोघे पोलीस कोठडीत आहेत. सुरत येथे अटक केलेल्या जिम्मीभाई भगत (४०), सोनू टेलर (२४) या दोघांची येथील पोलिसांनी कसून चौकशी केली असता मुख्य सूत्रधाराची माहिती हाती लागली. पोलिसांनी दोन्ही संशयितांचे ३० हजार रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत करत त्यातून काही माहिती मिळण्याचाही प्रयत्न सुरू आहे.www.konkantoday.com