चिपळूण तालुक्यातील खांडोत्री-देऊळवाडी येथील विहिरीत सापडला प्रौढाचा मृतदेह.
चिपळूण तालुक्यातील खांडोत्री-देऊळवाडी येथील विहिरीत प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी रात्री ९ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक विश्राम कोदारे (५५, खांडोत्री-देऊळवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक कोदारे जेवण झाल्यानंतर ते दारूच्या नशेत वाडीत असणार्या सभेला जातो असे सांगून घरातून निघून गेले. मात्र त्यांनी घराच्या बाहेर त्यांची चप्पल व बॅटरी ठेवलेली होती. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्यान त्यांची पत्नी दिपाली कोदारे व मुलगा रोशन कोदारे यांनी वाडीत जावून शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर त्यांचे शेजारी असलेले सोमा रपशी यांच्या मालकीच्या विहिरीत दीपक कोदारे यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com