खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मृतदेह असल्याचे सावंतवाडीतील इसमाला स्वप्न पडले त्याच्या आधारे पोलिसांनी शोध घेतल्याचा धक्कादायक प्रकार.

खेड तालुक्यातील भोस्ते घाटात सापडलेल्या सापळ्याचं गूढ अधिक वाढलं आहे. या घाटामध्ये निर्जनस्थळी एका मानवी हाडांचा सापळा आणि कवटी झाडाच्या फांदीवरती दोरीने लोंबकळलेल्या अवस्थेत बुधवारी संध्याकाळी सापडली.मात्र या प्रकरणाची पंचक्रोषीमध्ये चर्चा असतानाच सदर प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याचं पोलिसांच्या नोदींमुळे स्पष्ट होत आहे. सिंधुदुर्ग येथील सावंतवाडीमधील एका व्यक्तीला ज्या ठिकाणी हा सापळा सापडला तिथेच मृतदेह असल्याचे स्वप्न पडले. त्याने सदर बाब खेड पोलिसांना सांगितली. त्यानंतरच पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना हा रहस्यमय सापळा आणि कवटी आढळून आले. या संपूर्ण घटनाक्रमाची नोंद पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालामध्ये आहेएका व्यक्तीला स्वप्न पडलं त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास केल्याची नोंद पोलिसांच्या एफआयआरमध्ये सुद्धा करण्यात आली आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, 17 सप्टेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील आजगांव येथे राहणारे योगेश पिंपळ आर्या (वय 30 वर्ष) हे खेड पोलीस स्थानकात आले. ‘मला वारंवार स्वप्न पडतात. त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशनसमोर एका डोंगरात पुरुषाचे प्रेत असल्याचं दिसतं. तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन आम्हाला मदत करा असे सांगत आहे,’ असं योगेश यांनी पोलिसांना सांगितलं. योगेश यांच्या बोलण्यावर पोलिसांनी विश्वास ठेवत या भागाची तपासणी सुरु केली. पोलिसांच्या या तपासणीदरम्यान त्यांना भोस्ते घाटातील जंगलात एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्यासारखा वास येत होता. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर व प्लास्टिकच्या पट्टया बांधलेले व टॉवेलने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेतील अनोळखी व्यक्तीचे प्रेत दिसले. हे प्रेत झाडाला बांधलेल्या अवस्थेत खाली पडलेले दिसले. या प्रेतावर राखाडी रंगाचे जॅकेट, राखाडी रंगाची पँट होती. अनेक दिवसांपासून हा देह इथे असल्याचं त्याचा सापळा दिसत होतं यावरुन स्पष्ट झालं. या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची ‘आदिदास’ असं लिहिलेली सॅक आढळून आली. या मृतदेहापासून 5 फुटांवर एक कवटी सापडली. तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपराजवळ ‘ए.आय.आर’ कंपनीचे कळ्या रंगाचे बूट सापडले. मात्र मृतदेहाजवळ सापडलेल्या सॅकमध्ये पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारेकुठलेच ओळखपत्र किंवा पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात याचा तपास खेड पोलिसांनी सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button