केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी, दि.१९: (जिमाका)- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* शुक्रवार २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन. रत्नागिरी रेल्वेस्थानक येथून मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांबाबत चर्चा. (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). सकाळी ११.१५ वाजता पत्रकार परिषद (स्थळ: शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी). दुपारी १२ वाजता मेळाव्यास प्रमुख उपस्थिती (स्थळ: हॉटेल विवेक, शासकीय विश्रामगृहासमोर, माळनाका, रत्नागिरी). मोटारीने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी ५.२० वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे प्रयाण व जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.