
इंडिया आघाडी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार
दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या बैठकीमध्ये 21 नेत्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या घरी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मल्लिकार्जून खरगेंनी सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार का यासंदर्भातील प्रश्नावर थेट उत्तर दिलेलं नाही. “आम्ही योग्य वेळी योग्य पावलं उचलू” असं खरगे म्हणाले आहेत. मात्र इंडिया आघाडी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल असे संकेत खरगेंनी दिले आहेत. इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा हा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी आणि नरेंद्र मोदींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर खरगेंनी इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वखालील भारतीय जनता पार्टीविरोधातील संघर्ष करत राहील असं म्हटलं आहे. देशातील जनतेला भाजपाचं सरकार नकोय. त्यामुळेच इंडिया आघाडीकडून जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पावलं उचलली जातील, असं सूचक विधान खरगेंनी केलं.www.konkantoday.com