दापोलीतालुक्यातील तेरेवायंगणी पहिली वाडी येथेक्षुल्लक कारणावरून पाळीव कुत्र्याला बंदुकीने घातली गोळी.

दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी पहिली वाडी येथे क्षुल्लक कारणावरून कुत्र्याला १२ बोअर बंदुकीने गोळी घालून जखमी केल्याप्रकरणी पांडुरंग बाळू शिवगण याच्यावर दापोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन किसन भाताडे यांचा कुत्रा आपणाला त्रास देवून नुकसान करतो, असे कारण सांगून पांडुरंग शिवगण यांनी आपल्या ताब्यात असलेल्या १२ बोअर बंदूकीने पाळीव कुत्र्याला गोळी मारून जखमी केले.याबाबतची फिर्याद सचिन भाताडे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली. पाळीव कुत्र्याला गोळी मारल्याप्रकरणी पांडुरंग शिवगण यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५ आर्म ऍक्ट १९५९ कलम ३० प्राणी संरक्षण अधिनियम १९६० कलम ११ (१) (एल) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button